१० वी नंतर काय करावे?

      नमस्कार, मित्रांनो स्वागत आहे तुमच या माझ्या नवीन विषयात,की 10वी नंतर कूठल करीयर निवडावे?

 जे 10वी पास झाले त्यांना मनापासून अभिनंदन🥳💐.

    मित्रांनो,जर तुम्ही 10 वी पास झाले आहेत, तर तुम्हाला मनापासून अभिनंदन करू इच्छितो,आणि जे नापास झाले आहेत त्यांना पण सांगू इच्छितो की कृपया हताश होऊ नका,आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही दिवस स्वतःला busy करून घ्या,कारण रिकाम असताना डोक्यात सतत तेच विचार येतात,म्हणून तुम्ही अस अजिबात समजू नका की 10 वी नापास झालो,तर आता काय होईल? एवढं पण काही विशेष नाही आहे,तुम्हाला माहीत असेलच की 10 वी नापास सचिन तेंडुलकर आज जगात टॉप 10 क्रिकेटर्स मध्ये एक आहे,आणि भारतात तर एक नंबर पोजिशन वर आहे,

          आणखी एक गोष्ट लक्षात असू द्या की आयुष्य हीच खरी परीक्षा आहे,कारण शाळा कॉलेज नंतर आयुष्यात खूपच मोठमोठ्या परीक्षांना तोंड द्यायचं आहे,

        चला तर मग सुरू करूया की 10 वी नंतर काय केलं पाहिजे?

मित्रांनो,हा प्रश्न दहावीत असणाऱ्या जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला पडतो,आणि त्याला कळतच नाही की नेमके कुठली अशी फिल्ड मध्ये करीयर करावं की जिथं आपल करीयर होऊ शकत,आणि ते खूपच गोंधळात पडतात.

   

कारण घरचे म्हणतात सायन्स घे,पुढे चालून इंजिनिर हो,नाहीतर मग नातेवाईक म्हणतात की अमुक घे,कुणी म्हणेल कॉमर्स घे कारण सद्याला बँकेत खूपच मागणी आहे,आणि ती बिचारा गोंधडात पडून चुकीचं करीयर चॉईस करून घेतो,म्हणजे जस की त्याच्या नातेवाईक मध्ये जर कुणी इंजिनीरिंग करत असेल,तर तो पण इंजिनीअरिंग करायची म्हणून सायन्स ला,एडमिशन घेतो आणि मग सायन्स घेऊन नंतर नाराज होतो,की कुठून एडमिशन घेतल,त्यापेक्षा आर्ट्स घेतलेलं चांगलं राहील असत.

 
तुम्हाला काय आवडत? आणि कशात तुम्हाला जास्त रुची आहे?

    मित्रांनो,सगळ्यात आधी हेच बघा की तुम्हाला नक्की कुठल्या गोष्टीत जास्त रस आहे,भरपूर मुलांना हेच कळतं नाही की त्याला नेमक काय आवडत.

   तुमच्यातली आवड कशी शोधाल?

  मित्रांनो, तुम्हाला जर कुठलीपण रेसिपी करायला किंवा शिकायला आवडत असेल,तर तुम्ही सायन्स घेऊन पुढे हॉटेल चा कोर्स करू शकतात,जर आवड असेल तर,
  कारण,तुम्ही यात नापास जरी झालात तरी तुम्ही परत प्रयत्न कराल कारण तुम्हाला ती गोष्टीत रस आहे,
   जर तुम्हाला लहानपापासूनच गाड्यांमध्ये आवड असेल तर तुम्ही सायन्स करून मेक्यानिकल इंजिनीरिंग ल एडमिशन घेऊ शकता,
   आता काही जण म्हणतील की सध्याला तर इंजिनीअरिंग ला काय महत्व आहे,कारण तुम्हाला तर माहीतच असेल की जॉब मिळणं खूपच अवघड आहे,पण मित्रांनो या जगात टॅलेंटला  अजूनही खूपच किंमत आहे,जर तुम्हाला एखाद्या विषयात आवड असेल तर तुम्ही नक्कीच तीच यशस्वी व्हाल.
   
जर तुम्हाला अस वाटत असेल की या जगात स्पर्धा खूप आहेत,किंवा माझ्यापेक्षा पण खूपच talented आहेत,तर तुम्हाला सांगू इच्छितो की त्या फील्ड मध्ये भलेचं स्पर्धा असेल पण उर्वरित बाकीचे फक्त ८५% ते ९०% लोक हे फक्त ते आहेत जे आवड नसणारे,की लोक करत आहेत म्हणून आपणपण करून  बघुया,ज्यांना खरोखर त्या फील्ड मध्ये आवड आहे,असे खूपच कमी असतात,आणि त्यांना जरी नापास किंवा कमी मार्क्स पडत असतील,तरी पण त्यांचं भविष्य हे खूपच चांगलच आहे,कारण मार्क्स फक्त तुमच्या प्रगती पुस्तकावर असेल,पण डोक्यात किती ज्ञान आहे हे तुम्हाला च माहीत असत,त्या प्रगती पुस्तकावर काहीच होत नाही.

 
या जगात स्पर्धा खूप आहे काय करायचं?

   
तुम्हाला हे मी एका उदाहरणाने समजवून सांगतो,म्हणजे तुम्हाला कळेल की या जगात स्पर्धा खूप आहेत,पण तरी पण एक प्लॅटफॉर्म थोडीच आहे,खूपच आहेत,
   एकदा इंडियन आयडल मध्ये एक स्पर्धक जो ऑडिशन मध्येच नापास झला तरी पण त्याने पुढे चालून यूट्यूब वर करिअर चालू केलं,आणि आज त्याच्या युट्यूबवर लाख क्या पुढे sabscribers आहेत,तुमच्या जवळ जर टॅलेंट असेल तर फक्त तो ओळखा की कशात तुम्हाला जास्त आवड आहे.

   कशात जास्त स्कोप आहे?

  तुम्हाला ज्या फील्ड मध्ये आवड असेल तीच फील्ड तुमच्यासाठी योग्य ठरेल,म्हणून 10 वी नंतर काय करावे? हे लोकांना विचारण्यापेक्षा तुमच्या मनाला अस विचारा की तुम्हाला नक्की काय आवडत,तुमच मन कशात जास्त involved होतंय ते बघा,
  लोक म्हणतील हे घे याला जास्त जास्त स्कॉप आहे,मित्रानो स्कॉल या जगात प्रत्येक गोष्टीला आहे,आर्ट्स केलेली मुल पण कलेक्टर झाली आहेत,
  त्यामुळे कुठलीच फील्ड ही कमी समजू नका,
   चला तर मग तुम्ही चांगलीच फील्ड मध्ये करिअर कराल अशी आशा,बाळगतो.
    भेटूया अशाच चांगल्या विषयात आणि खाली कॉमेंट करायल
 विसरू नका,
     Thanks for reading😊👍
  Best of luck for your bright future to who's reading this blog,and if you like so please share to your friends.
       Jai Hind Jay bhart.   

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने